*****जिल्हयात सर्वात स्वच्छ पुरंदर तालुका ***** वेल्हा दुस-या क्रमांकाचा स्वच्छ तालुका ***** तिसरा क्रमांक खेड व बारामतीला विभागून*******

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या दि.1 नोव्हेंबर 2012 रोजीच्या शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-2012/प्र.क्र.72/पापु-07 नुसार उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्या नियंत्रणाखालील संपुर्ण स्वच्छता अभियान-TSC (निर्मल भारत अभियान-NBA) व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा यांच्या सनियंत्रणाखालील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष (DWSM cell) यांचे विलीनीकरण करण्यात आले. यानुसार एकीकृत कक्षास जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष (District Water & Sanitation Mission Cell- DWSM Cell) असे नाव देण्यात आले. यानंतर पुढे या कक्षाची जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली व या कक्षाचे सनियंत्रण नव्याने पद निर्मिती करून उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांचेकडे देण्यात आले. या कक्षात एकुण 7 शाखा कार्यरत आहेत यामध्ये 1.स्वच्छता शाखा 2. पाणी गुणवत्ता शाखा 3.माहिती शिक्षण व संवाद शाखा 4.मनुष्यबळ विकास शाखा 5.सनियंत्रण व मुल्यमापन शाखा 6.वित्त शाखा 7.आस्थापना शाखा. या सर्व शाखांमार्फत स्वच्छता, पाणी गुणवता, पाणी बचत याबाबत प्रचार, प्रसार व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

 
 *पुणे जिल्हा हागणदारीमुक्त घोषित*
                       
*निश्चयपुर्ती हागणदारीमुक्तीची–माझा जिल्हा, स्वच्छ जिल्हा, पुणे जिल्हा*

पुणे जिल्हयात गेली दशकाहून अधिक चाललेल्या स्वच्छता अभियानाला मार्च 2017 मध्ये यश प्राप्त झाले. जिल्हा स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण  अंतर्गत हागणदारीमुक्त घोषित करण्यात येत आहे. सन 2016-17 मध्ये पुणे जिल्हयात 1 एप्रिल 2016 रोजी 121921 एवढे शौचालय बांधकामाचे बेसलाईन 2012-13 सर्वेनुसार उद्दीष्ट होते. जिल्हयातील कामाच्या गतीवरून राज्य शासनाने सन 2016-17 मध्‍ये 10 जिल्हये याच वर्षी संपुर्ण हागणदारीमुक्त करण्याचे ठरविले होते. यामध्ये पुण्याचा समावेश करण्यात आला. एका वर्षात एक लक्ष पेक्षा जास्त शौचालय बांधकाम पुर्ण करणे सोपे आव्हान नव्हते. मात्र तत्कालीन मा.अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 17 जुलै 2016 रोजी जिल्हास्तरावर निश्चय कार्यशाळा घेवून स्वच्छतेच्या कामाला सुरूवात केली. जिल्हास्तरावरील सर्व पदाधिकारी व अधिकारी तसेच पंचायत समिती स्तरावरील सर्व पदाधिकारी व गट विकास अधिकारी यांनी या दिवशी निश्चय केला की डिसेंबर 2016 पुर्वी तालुका व जिल्हा हागणदारीमुक्त करू.
सन 2012-13 मध्ये झालेल्या शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षणानुसार एक लाखापेक्षा जास्त शौचालय बांधायची म्हणजे काहितरी वेगळे व नाविण्‍यपुर्ण नियोजन आवश्यक होते. त्यासाठी प्रत्येक स्तरावर वेगवेगळी यंत्रणा उभी करून, जिल्हा परिषदेतील सर्व यंत्रणेला प्रोत्साहीत करणे गरजेचे होते. यासाठी पुढिल नियोजन टप्याटप्याने केले –
1.      हागणदारीमुक्त न झालेल्या तालुक्यांचे जिल्हा विभाग प्रमुखांना वाटप
2.      सनियंत्रणासाठी प्रत्येक तालुक्याचा स्वच्‍छ भारत मिशन व्हॉट्स ऍ़प ग्रुप – यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पासून सरपंच व ग्रामसेवक यांचा सहभाग
3.      जिल्हयातील हागणदारीमुक्त न झालेल्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये शौचालय न बांधलेल्या कुटुंबांना 8 प्रकारे कारवाई करण्याचे ठराव संमत केले.
4.   जिल्हास्तरावर जि.प.अध्यक्ष, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त प्रेस घेवून अभियानाला गती देण्यासाठी आव्हान.
5. जिल्हा स्तरावरून सनियंत्रणासाठी दैनंदिन रीपोर्ट तयार करून ग्रुपवर टाकण्यात येत आहेत, यामुळे तालुकास्तरावर कामांमध्ये स्पर्धा सुरू झाली.
6.      शौचालय नसलेल्‍या कुटुंबांना वैयक्तिक संवाद साधण्यासाठी गृहभेट अभियान
7.      जिल्हास्तरावर पदाधिकारी यांची हागणदारीमुक्त जिल्हा परिषद गट स्पर्धा
8.      तालुकास्तरावर प्रत्येक गावासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नियुक्ती
9.      गावस्तरावर सर्व शासकीय कर्मचारी यांना शौचालय नसलेल्या कुटुंबांचे वाटप
10. गुड मॉर्निंग पथक- पहाटे व सकाळी सकाळी शौचास उघडयावर जाणा-या लोकांना पकडून त्यांना पुष्पगुच्छ देवून शौचालय बांधकामास प्रवृत्त करणे.
11. बारामती व इंदापुरसाठी विद्यार्थी व महिला मेळावा व भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन.
12. जिल्हयातील महाविद्यालये व कर्मचारी संघटनांनी गावे दत्तक घेतली.
13. जास्त शिल्लक गावांसाठी इंदापुर मध्ये बारामती, पुरंदर व दौंड मधील अधिकारी व कर्मचारी यांची मदतीसाठी नियुक्ती
14. जिल्हा स्वच्छ भारत टीमची इंदापुर साठी मुक्कामी नियुक्ती
15. कुटुंबांना जिल्हा, तालुकास्तरावरून शौचालय बांधकामासाठी विनंती पत्र.
16. गट विकास अधिकारी व पोलिस यंत्रणेच्या सहकार्याने संयुक्त मुंबई पोलिस अधिनियम 1958 नुसार नोटिसा देण्यात आल्या.
17. शौचालय नसलेल्या कुटुंबांची नावे फ्लेक्सवर लावण्यात आली.
याप्रकारे 17 कलमी कार्यक्रम राबवून 121832 शौचालय बांधकाम पुर्ण करून 1400 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित केल्या. यासाठी आजी-माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व सन्मानिय सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद खातेप्रमुख, अधिकारी, पंचायत समिती पदाधिकारी व अ‍धिकारी, सरपंच-ग्रामसेवक तसेच गावस्तरावरील सर्व कर्मचारी यांनी या मोहिमेत रात्रंदिवस काम केले. आणि जिल्हा वेळेत हागणदारीमुक्त करून राज्यात नव्हे देशात इतिहास रचला. *पुणे जिल्हयाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आत्तापर्यंत सन 2014-15 मध्‍ये 14015, सन 2015-16 मध्ये 30220 तर चालु वर्षी 1,21,832 शौचालय बांधकाम करून आगळा वेगळा ठसा राज्यात उमटवला आहे.*
पुणे जिल्हा मा.अध्यक्ष विश्वासराव देवकाते, तत्कालीन अध्यक्ष प्रदिप दादा कंद व मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई,अति.मु.का.अ.यशवंत शितोळे यांनी जिल्हा 29 मार्च 2017 रोजी हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल साकोरे, नितीन माने, सत्यजित बढे हे उपस्थित होते. 

      

020 26052938