*****जिल्हयात सर्वात स्वच्छ पुरंदर तालुका ***** वेल्हा दुस-या क्रमांकाचा स्वच्छ तालुका ***** तिसरा क्रमांक खेड व बारामतीला विभागून*******

माहिती शिक्षण व संवाद

आंतरव्यक्ति संवाद - वर्तन बदलाची गुरुकिल्ली


वर्तन बदल संवाद म्हणजे -

व्यक्तीचे वर्तन,सवयी आणि त्या संबंधीचे पर्यावरणीय घटक यांच्यात बदल घडवून आणण्याची अथवा त्या वर प्रभाव टाकण्याची वर्तन बदल संवाद ही एक कला आहे.या संवादाच्या माध्यमातून आरोग्य सुधारण्यास,आजाराचे प्रमाण कमी करण्यास आणि व्यक्तिगत हानी टाळण्यास प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष मदत होते.

संवाद म्हणजे -
  • लोकांमधील विशिष्ठ विषयावरील माहितीच्या आदान-प्रदानाची असण्वाद हि एक प्रक्रिया आहे.
  • संवाद ही प्रक्रिया आहे फलित नाही.
  • संवाद म्हणजे केवळ माहितीपत्र तयार करणे,पोस्टर तयार करणे किंवा सामाजिक नाट्य नाही.
अंतर व्यक्ती संवाद -
अंतर व्यक्ती संवाद हा व्यक्ती-व्यक्ती किंवा व्यक्ती व छोट्या गटातील संवाद आहे. मौखिक व अमौखिक पद्धतीने होणारया या संवादात माहिती आणि भावनांचे आदान-प्रदान होते.विशिष्ठ विषयावर विश्वासार्ह नातेसंबंध निर्माण करण्याच्या हेतूने होणारया या संवादात सर्वांचा सहभाग अपेक्षित असतो तसेच हा संवाद दुहेरी असावा लागतो.

अंतर व्यक्ती संवादाचा हेतू -
  • ग्राहक व सेवा पुरवठादार यांच्यात परस्पर आदरभाव, सहकार्य आणि विश्वास निर्माण करण्यासाठी.
  • ग्राहकाचे समाधान वाढविण्यासाठी
  • ग्राहकाला माहितीच्या माधमातून शिक्षित करण्यासाठी.
  • ग्राहकाला बदल स्वीकारण्यास आणि त्यातील सातत्य टिकवण्यास मदत करण्यासाठी,
  • पुरविल्या जाणार्या सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी.
अंतर व्यक्ती संवादाचे वर्तन बदलासंदर्भात महत्व -
वर्तन बदलासाठी प्रभाव टाकणारा अंतर व्यक्ती संवाद हा संवादाचा महत्वाचा प्रकार आहे.अंतर व्यक्ती संवाद हा एकूण संवाद प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा टप्पा असून याच संवादातून व्यक्ती आपले वर्तन बदलणार कि नाही हे ठरते. ग्राहकाचे समाधान प्रभावी संवादाचे द्योतक ठरते . ग्राहकाला किती काळजीपूर्वक हताळल्या जाते यावर त्याच्या वर्तन बदलाचा निर्णय मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.
  • अंतर व्यक्ती संवाद प्रक्रिया सुलभ करतो.
  • अंतर व्यक्ती संवदाच्या माध्यमातून प्रश्न,संभ्रम दूर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते.
  • विविध मार्गांनी प्राप्त होणाऱ्या संदेशांना दृढ करण्यात,पुरुस्कृत आणि त्यांना समजावण्यात अंतर व्यक्ती संवाद महत्वाची भूमिका पार पडतो.

एखादी व्यक्ती आपले वर्तन बदलवण्याच्या विचाराच्या टप्प्यावर असेल तर अशावेळी अंतर व्यक्ती संवाद महत्वाचे माध्यम ठरतो. अंतर व्यक्ती संवाद व्यक्तिगत समुपदेशन, गट स्तरावर अभिप्रेरण,लहान गटातील चर्चा,गृह भेटी,बरोबरीच्या लोकातील संवाद आणि भूमिका नाट्य ई . माधमातून होऊ शकतो.

अंतरव्यक्ती संवाद बलस्थाने
  • · संदेशाची विश्वासार्हता वाढते.
  • · सविस्तर माहिती दिल्या जाते.
  • · प्रात्यक्षिक देता येते त्यामुळे सह्भागींच्या कौशल्यात वाढ करता येते.
  • · पोषक वातावरण निर्माण होते.
  • · वयैक्तिक आणि संवेदनशील विषयावर चर्चा करता येते.
  • · प्रवृतीकरणासाठी उपयुक्त.
  • · नकारात्मक भूमिका व गैरसमज दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची संधी.
  • · सहभागी स्वरूपामुळे सर्वाना भाग घेता येतो.
  • · संदेश,विचार,सराव या बाबत तत्काळ प्रतिक्रिया देता येते.
  • · व्यक्तिगत अडचणीवर मत करण्यासाठी मदत होते.
  • · शाश्वत अपेक्षित वर्तनासाठी संदेशाची उजळणी शक्य होते.
अंतरव्यक्ती संवाद मर्यादा
  • · या प्रक्रियेला वेळ जास्त लागतो.
  • · कमी लोकांपर्यंत पोहोचता येते.
  • · खर्चिक प्रक्रिया.
  • · अंतर व्यक्ती संवाद कौशल्ये प्राप्त करण्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्नाची गरज.
अंतर व्यक्ती संवाद - विविध कौशल्ये
1.मौखिक संवाद
  • · लक्षपूर्वक ऐकणे
  • · प्रश्न विचारण्याचे कौशल्य
  • · भावना व्यक्त करणे समजून घेणे
  • · सह्भागीची मते सारांशाने समजून घेणे
  • · कौतुक करणे,प्रोत्साहन देणे
  • · प्रतिक्रियांची देवाणघेवाण
  • · गरजेनुसार आवश्यक माहिती देणे
  • · सहभागींना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणे
  • · महत्वाच्या संदेशांची उजळणी करणे
  • · अफवा आणि गैरसमजाचे निराकरण करणे
2.अमौखिक कौशल्ये
  • · मैत्रीपूर्ण आणि सहज हावभाव
  • · हसून मानेने प्रतिसाद
  • · लक्षपूर्वक ऐकण्यासाठी पुढे सरकून बसणे
  • · डोळ्यांनी संपर्क
  • · निवांत आणि मैत्रीपूर्ण वावर
  • · संवादादरम्यान दोघामधील अंतर ( स्थानिक परंपरांचा आधार घेवून)
  • · मैत्रीपूर्ण स्वर आणि आवाज
अंतर व्यक्ती संवादाची वैशिष्ठे
अंतर व्यक्ती संवाद हे एक कौशल्य आहे जे आपण मित्रासोबत,कुटुंबासोबत आणि आपल्याशी व्यावहारिक संबंधातील व्यक्ती सोबत वापरात असतो. अंतर व्यक्ती संवादाला आपण बहुतेकवेळा माहिती देवाण-घेवाणीचे माध्यम समजतो मात्र ते त्याहून निशितच अधिक असते. अंतर व्यक्ती संवादाचे काही महत्वाचे घटक आहेत आणि त्यांचे पुढील तीन प्रकारे वर्गीकरण करता येते

मुलभूत घटक
  • · आदर
  • · मूल्यांशी बांधिलकी
  • · देहबोली
  • · न्यायाधीशाची भूमिका नाही
संवाद संपर्क
  • · शाब्दिक आधार
  • · सर्वांचा सहभाग
  • · प्रतिसादाला वाव
ज्ञान / माहिती
  • · भावनेसह
  • · अनुभवाची जोड
  • · योग्य, अचूक माहिती
  • · नवा विचार
अंतरव्यक्ती संवादाच्या वाशिष्ठ्याधारे संवाद म्हणजे केवळ माहितीचे आदान-प्रदान नाही हे सहज स्पष्ट होते.यशस्वी अंतरव्यक्ती संवादासाठी संवाद्काकडे ऐकण्याची कला असणे आवश्यक आहे. चांगले ऐकणे म्हणजे-
  • · तुम्ही कशासाठी एकता ते समजून घ्या
  • · महत्वाचे मुद्दे काळजीपूर्वक ऐका (का,कधी,कुणी,कुठे,केंव्हा ई )
  • · वैयक्तिक मताला दूर ठेवा
  • · लक्ष विचलित करणारे आवाज,विचार,कल्पना टाळा.
संपर्क दृढीकरण
संपर्क दृढीकरण म्हणजे संवाद्काने सह्भागींशी खूप चांगल्या पद्धतीने जवळीक निर्माण करणे होय. यात सहानुभूती, आपलेपणा असला कि संबंध दृढ होण्यात मदत होते. या संदर्भात महत्वाच्या बाबी पुढी प्रमाणे.
  • संपर्क दृढ करणे हि प्रभावी संवादाची महत्वाची पायरी आहे.
  • या द्वारे सहभागीना मोकळेपणाने व्यक्त होता येते.
  • संपर्क दृढ असला कि दिलेली माहिती सहभागींना सहज लक्षात येते, आणि त्यांचे दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वागणे शक्य होते.


----------------------------------------------------------------------------------------------
 

 
----------------------------------------------------------------------------------------------